Breaking News

मायबाप प्रशासन बीड बायपासवर किती जीव जायची वाट बघतय- अशोक ढोले


बायपासवर उड्डाण पूल करण्याची ढोले यांची मागणी

बीड :  गेल्या पाच ते सहा महिणापासून बीड बायपासवर (समनापूर परिसर) मोठ्या प्रमाणात अपघात होत असून कित्येक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे. अपघातही खूप भिषण होत आहेत की पाहणाऱ्यांचे ह्रदय हेलावून जात आहेत, इतके  भयावह दृश्य अपघातस्थळी पाहायला मिळत आहेत. या गंभीर बाबीकडे  स्थानीक प्रशासन आणि रस्ते विकास प्राधिकरण विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. मायबाप प्रशासन आणखी किती लोकांचे जीव जायची वाट बघत आहे? हा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. होणारे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनासह संबंधित विभागाने बीड बायपास चौकात (समनापुर परिसर) उड्डाण पूल करण्याची तसदी घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक(दादा) ढोले पाटील यांनी केली आहे.

जिल्ह्यात बायपास रस्ता पूर्ण झाल्यानंतर एक - दिड वर्षांपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बायपास रस्त्यावरून सुसाट वेगात चार चाकीसह इतर वाहने जात असतात. परंतु शहराकडे जाणारी आणि शहरातून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या वाहनांना बायपास चौकातून (समनापूर परिसर) जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून अनेक लोकांनी जीव गमावला आहे. चौकातून जाताना वाहनांना ताळमेळ लागत नसल्याने हे अपघात घडत आहेत. गेल्या आठवड्यात तेर तीन ते चार अपघात होऊन दोघाना जीव गमवावा लागला असून इतर ठिकाणी जसे उड्डाण पूल केली आहेत त्याच धर्तीवर बीड बायपास चौकात ही उड्डाण पूल करण्याची अत्यावश्यक बाब झाली असून आणखी किती निष्पाप नागरिकांचे जीव जाण्याची वाट मायबाप प्रशासन बघत आहे. संबधीत विभागाने या गंभीर बाबीचा विचार करत लवकरात लवकर उड्डाण पूल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक (दादा)ढोले पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.


No comments