Breaking News

मंडळ अधिकारी दळवी यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती


गौतम बचुटे । केज  

तहासिलचे येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी बाबुराव दळवी यांना सेवाजेष्ठते नुसार नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाली आहे.

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील मूळचे असलेले बाबुराव दळवी हे सद्या युसुफवडगाव महसूल मंडळात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत होते. सेवा जेष्ठते नुसार त्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली आहे. त्यांना परभणी जिल्ह्यात नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती मिळालली आहे. या पदोन्नती बद्दल केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार सुहास हजारे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, नायब तहसीलदार लक्ष्मण धस, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचाऱ्यांनी दळवी यांचे अभिनंदन केले आहे.

No comments