केमिकल स्फोट प्रकरण : दुकान मालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
बीड : शहरातील चंपावती हार्डवेअर दुकानाचा मालक नितिन लोढावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिजामाता चौकातील त्याच्या गोडाऊन मध्ये तीन दिवसांपूर्वी केमिकलच्या झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला होता.
नितीन लोढा याच्या दुकानातील वापरात नसलेल्या केमिकल गोडावून मध्ये नेण्यात आले. त्यावेळी शिल्लक असलेले केमिकलचे कॅन नालीत ओतत असताना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अनिरुद्ध पांचाळ नावाचा कामगार जागीच ठार झाला तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना घडली. हा स्फोट एवढा भीषण होता, की शेजारी असलेल्या डॉ. शेंडगे यांच्या रुग्णालयाच्या इमारतीच्या काचा फुटल्या होत्या. याप्रकणी चंपावती हार्डवेअर दुकानचा मालक नितीन लोढा विरोधात सदोष मनुष्य वधाचा गिन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम आंत्रम करत आहेत.
No comments