Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परळीत विवाह संपन्न


परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परळी येथील सोपानकाका मंदिरात दि.१३ डिसेंबर रोजी दुपारी १.३५ वा. रिपाइं चे नेते सुरेश नामदेव रोडे यांचे सुपुत्र विक्रांत यांचा विवाह अश्विनी वंजारे यांच्या सोबत विवाह संपन्न झाला.
यावेळी त्रिशरण, पंचशील व बुद्ध वंदना घेऊन हा मंगल परिणय संपन्न झाला. यावेळी नवविवाहित दाम्पत्याला पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतांना स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे विजय साळवे, माजी सभापती पंडित झिंजुर्डे, फुले आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे, विधिचार्य मिलिंद घाडगे, विजयकुमार गंडले, जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, विकास वाघमारे, विजय हजारे आदींसह रोडे व वंजारे कुटुंबीयांची उपस्थिती होती.No comments