Breaking News

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्या विरोधात परळी शहर व तालुक्यात कडकडीत बंद


परळीत महाविकास आघडीच्या वतीने जोरदार निदर्शने तर सिरसाळ्यात ठिय्या आंदोलन

परळी : मंगळवार दि. 8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली होती. शेतकऱ्यांच्या भारत बंदला परळी शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना यांनी पाठिंबा दिला होता. शेतकऱ्यांच्या भारत बंदला परळी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर  कृषी उत्पन्न बाजार समित्यासह सर्व कामगारही या बंदमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान परळीत राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस, माकप, वंचित बहुजन आघाडी, आदी पक्षाच्या वतीने  कृषी कायद्याविरोधात घोषणाबाजी करत राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकार मुर्दाबाद च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. तसेच सिरसाळा येथे ही शेकडो शेतकरी बांधवांनी ठिय्या आंदोलन करून केंद्र सरकारबद्द्ल संताप व्यक्त केला.


आज दि.8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंद च्या पार्श्वभूमीवर शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात सकाळी निदर्शन करण्यात आली.  जाचक कायदा रद्द करावा, केंद्र सरकार मुर्दाबाद अशा घोषणांनी परळी शहर दुमदुमून गेले. यावेळी माकपचे पी.एस.घाडगे, पांडुरंग राठोड, पी.एस.नागरगोजे, राष्ट्रवादीचे वैजनाथ सोळंके, बाजीराव धर्माधिकारी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे, काँग्रेसचे बाबु नंबरदार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

इटके काॅर्ननर येथे रास्ता रोको

    इटके काॕर्नर येथे रास्ता रोको करण्यात आला.या रस्ता रोको आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सूर्यभान नाना मंडे पं स. उपसभापती पिंटू मुंडे मोहन दादा सोळंके पंस सदस्य माऊली मुंडे पस सदस्य वसंत तिडके सरपंच अमर गीते नागनाथ कराड, दत्ता कराड, अभिमान मुंडे, नवनाथ जोगदंड, महारुद्र मुंडे, देवराव मुंडे, सुग्रीव मुंडे, महादेव सांगळे, तुकाराम काळे, राजेभाऊ मुंडे, बबन काळे, विष्णू पारवे, बाबुराव गिते, अमर मुंडे, बापूराव नागरगोजे, युनुस बेग, हनुमंत कामाळे, बबन कोकाटे, भागवत मुंडे, शिवाजी सोळंके, जगन्नाथ मुंडे,अगद मुंडे, राहूल मुंडे, माणिक मुंडे,भागवत मुंडे, धोडीराम मुंडे, रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सिरसाळा येथे ठिय्या आंदोलन

केंद्र सरकारच्या नवीन कायद्याविरोधात सिरसाळा येथे शेतकरी बांधवांच्या वतीने मोठ्या प्रमाणात हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात केंद्र सरकार मुर्दाबाद  नवीन कृषी कायदा रद्द करा अशी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माकप चे कॉ.अजय बुरांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड आदि राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

चोख पोलिस बंदोबस्त

दरम्यानच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर परळी शहर व तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.No comments