Breaking News

नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या सूचनेवरून शहरात विकासकामे सुरू - डॉ. योगेश क्षीरसागर

बीड :  शहरातील पेठ बीड भागातील कंकालेश्र्वर मंदिर परिसर ते शहेनशहावली दर्गा या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

बीड शहरातील रखडलेली आणि विरोधकांनी अडवलेली रस्ते, नाल्यांची कामे जिल्हाधिाऱ्यांच्या आदेशाने आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या सूचनेवरून सुरु झाली आहेत.पेठ बीड भागातील रखडलेली विकासाची कामे देखील सुरू झाली आहेत. यावेळी कंकालेश्‍वर मंदिर परिसर ते शहंशावली दर्गा या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.या कामाचे उद्घाटन नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सांगितले की, मागील काही काळात विरोधकांकडून विकासाची कामे अडवली जात होती. राजकीय स्पर्धा ही विकासासाठी असावी मात्र विरोधक हे विकासासाठी नव्हे तर स्वार्थासाठी राजकारण करत आहेत. मात्र आम्ही गरिबांच्या हितासाठी जास्तीत जास्त कामे करत आहोत आणि करत राहणार.  विकासाची कामे पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे भविष्यात देखील असेच विकासाची कामे करत राहणार असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतः ची आणि परिवाराची काळजी घ्यावी आणि तोंडाला मास्क लावणे, हात धुणे व सोशल डिस्टन्स पाळण्याची विनंती केली. याप्रसंगी नगरसेवक सादेक जमा, सतीश (आप्पा) पवार, मुन्ना इनामदार, सय्यद निसार, साजेद जहांगिरदार, नबील जमा, कामरान शेख, यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

z
No comments