Breaking News

आ. सुरेश आण्णा धस यांच्या पाठपुराव्याला यश, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश!


मनुष्यहानी टाळण्यासाठी त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारा; प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी दिले आदेश..!

के. के. निकाळजे । आष्टी

आैरंगाबाद, अहमदनगर, बीड व सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक बिबट्याला मनुष्यहानी टाळण्याच्या दृष्टीने ठार मारण्याचे आदेश शासन वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी  दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी आदेश क्रमांक कलम 11/11/202021 क्रमांक कक्ष 23(4) प्र क्र. 53(2020-21) 2001 नुसार आदेश जारी केला आहे.

औरंगाबाद, नगर, बीड व सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील हैदोस घातलेल्या व एकूण 10 पेक्षा अधिक लोकांचे जीव घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करा, जेरबंद करा किंवा ठार करा अशी रितसर मागणी आ. सुरेश धस यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना पत्राद्वारे केली होती. प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी आ. सुरेश धस यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.


No comments