Breaking News

जप्त वाळुसाठा प्रकरणी चौकशी करा यासाठी सिंधफना नदीपात्रात दत्ता जाधव यांचे उपोषण

गेवराई :  तालुक्यातील कोपरा येथील जप्त वाळू साठयाचा वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन देऊनही, खुल्या पद्धतीने वाळूचा लिलाव न करता थेट गुत्तेदाराला वाळूसाठा दिलेला आदेश रद्द करावा व सिंदफना नदीपात्रातून वाळू चोरी गेल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गेवराई, मंडळ अधिकारी, तलाठी यांना तत्काळ निलंबित करावे याकरिता कोपरा येथे जप्त केलेल्या वाळू साठ्याजवळ दि.१९ डिसेंबर  पासून युवानेते दत्ता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात रयत शेतकरी संघटना प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर सहभागी झालेले आहेत.

     


       

मौजे कोपरा येथे तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी संयुक्त कार्यवाहीने दि.२२ डिसेंबर रोजी वाळू साठा जप्त केला होता.सदरील जप्त वाळू साठ्याचे जाहीर प्रगटन देऊन लिलाव करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी टिळेकर यांनी दिले होते.त्यानंतर तहसील कार्यालय गेवराई यांनी दि.४ डिसेंबर रोजी वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन देऊन दि.७ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय गेवराई येथे वाळूचा लिलाव होणार असल्याचे कळविले होते.या जाहीर प्रगटना नंतर स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालय गेवराई येथे लिलावात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या लिलावात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने उपविभागीय अधिकारी टिळेकर यांना मर्जीतील ठेकेदारास वाळू साठा देता आला नसावा,त्यामुळे थातूर-मातूर कारण देत लिलाव रद्द करण्यात आले असल्याचे उपस्थित सहभागी झालेल्या नागरिकांना सांगितले व पुढील तारखेस लिलाव होईल त्यावेळी आपणास कळविण्यात येईल असे लेखी दिले.

या वाळूचा लिलाव होऊन ती वाळू परिसरातील सर्वसामान्य गरजू नागरिकांना मिळेल, या आशेने अनेक जण त्याकडे लक्ष ठेऊन होते.परंतु आपल्याला ज्या ठराविक व्यक्तीस वाळू साठा द्यायचा आहे तो देता येत नसल्याने उपविभागीय अधिकारी यांनी दुसरी शक्कल लढवत शासकीय कामाच्या नावाखाली थेट वाळू टेंडर दिले.वास्तविक एखाद्या जप्त वाळूचे वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन दिल्यानंतर फेरलीलाव न करता गुत्तेदारास वाळू देने संयुक्तिक नाही.लिलावामध्ये खुली बोली असल्याने स्पर्धा होऊन,ती वाळू अंदाजे १० लक्ष रुपयांपर्यंत गेली असती.त्यामुळे प्रशासनाचा महसूल बुडविण्याचे काम उपविभागीय अधिकारी यांनी केले असून मनमानी कारभार केलेला आहे.त्यामुळे सदरील वाळूचा फेरलिलाव करून खुल्या बोलीद्वारे करण्यात यावा व सदरील ठिकाणच्या वाळू चोरीस उपविभागीय अधिकारी,बीड,तहसीलदार,गेवराई,मंडळ अधिकारी,पाचेगाव व तलाठी याना तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी जप्त वाळूसाठ्याजवळ सिंधफना नदीपात्रात कोपरा हद्दीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील भाऊ ठोसर, युवराज लाखे, विनोद मते, आकाश जाधव,भरत हतागळे आदी यांनी पाठिंबा दिला.No comments