Breaking News

शेतकऱ्यांसाठी शिवसंग्राम रस्त्यावर : महावितरणच्या विरोधात जरुड फाट्यावर केलं रस्तारोको आंदोलन !


शेतकऱ्यांसाठी दिवसा उच्च दाबाचा विदयुत पुरवठा करा- सुधीर काकडे

बीड :  शेतकऱ्यांचे  अतिवृष्टी मुळे अतोनात नुकसान झालेले आहे. कापूस, सोयाबीन, हि पिके अक्षरश: वाया गेली. यातून कसाबसा सावरलेला शेतकरी पुन्हा बिबटयाचा दहशती खाली शेतात जीव मुठीत घेऊन वावरत आहे.शेतकऱ्याच्या विहिरीत, बोर मध्ये पाणी असून सुद्धा बिबट्या, रानडुक्कर व इतर हिंस्र प्राण्याच्या दहशदीमुळे रात्री पाणी देण्यास बंद केले आहे. दिवसा महावितरण कमी दाबाने वीज पुरवठा करत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. अश्या विविध समस्यां संदर्भात शिवसंग्राम ने वारंवार पाठ पुरवठा करूनही महावितरण हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे मा.आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाने  व जिल्हाध्यक्ष सुधीर (बापू) काकडे यांच्या नेतृत्वाखाली बीड-परळी हायवे वर जरुड फाटा येथे शिवसंग्राम संघटनेच्या वतीने शेतकऱ्यासह भव्य रस्ता रोको करण्यात आला. या रस्ता रोको मध्ये शेतकरी स्वयंम स्फूर्तीने सहभागी होऊन शासन व महावितरणच्या विरोधातील असंतोष व्यक्त केला. या वेळी जिल्हाध्यक्ष सुधीर (बापू) काकडे, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी (भैय्या) मेटे, जिल्हासरचिटणीस अनिलराव घुमरे, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, उल्हास घोरड,सीताराम घुमरे,राजेंद्र माने  यांनी शेतकर्यांच्या प्रश्नां विषयी पोटतिडकीने आपल्या भावना व्यक्त केल्या.         

                                                                                           
               
शेतकऱ्यांना दिवसा उच्च दाबाचा विदुत पुरवठा करावा, डीपी जळाल्यास २ दिवसात नवीन डीपी उपलब्ध करावी, खांडे पारगाव परिसरातील ७ गावांना नवीन सबस्टेशन उपलब्ध करून द्यावेत, ग्रामीण भागात नवीन अर्जदारांना तात्काळ  डीपी उपलब्ध करावी अश्या विविध मागण्या करीता महावितरणच्या विरोधात रस्ता रोको करून महावितरणचे अभियंता यांना निवेदन देऊन शेतकऱ्याना दिवसाचा वीज पुरवठा न केल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसंग्राम च्या वतीने देऊन  रस्ता रोको थांबवण्यात  आला. या वेळी शिवसंग्राम चे  जिल्हाध्यक्ष सुधीर (बापू) काकडे,युवक जिल्हाध्यक्ष रामहरी (भैय्या) मेटे, जिल्हासरचिटणीस अनिलराव घुमरे,तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे  सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,महिला जिल्हाध्यक्ष मिराताई डावकर, प्रशांत डोरले,अक्षय माने, पिंपळनेर जेष्ठ नेते गोपीनाथ बापू घुमरे,बळीभाऊ थापडे,विजय सुपेकर, उल्हास घोरड,महादेव बहिर,सीताराम घुमरे,मसू काळे,सुनील थोरात,लहू डोके,रामदास काळे,विलास चव्हाण, संतोष पवार, नीलकंठ शिंदे, एकनाथ वाणी, तात्या बिते, आबा सानप, अनिल जाधव, श्रीराम येवले, हनुमंत बोर्गे, सुनील थोरात, धर्मराज मसवले, कुठे सरपंच(बोरफडी) आदी सह मोठ्या प्रमाणात शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव  उपस्थित होते.No comments