Breaking News

बीड नगरपालिके वर विविध मागन्यासाठी शिवसंग्राम महिला आघाडीच्या वतीने "हंडा बजाओ आंदोलन" करणार- अनिल घुमरे


बीड :  शहरात गेल्या काही दिवसापासून नागरिक हे इतर समस्ये बरोबरच पाण्या विनाही बेहाल आहेत. तसेच  मंजूर झालेल्या घरकुल योजनेत देखील फार मोठा सावळा गोंधळ दिसून येत आहे. त्यामध्ये फक्त मोजक्याच नागरिकांना घरकुल चे हफ्ते मिळालेले आहेत असे का? बाकी लोकांना  का मिळाले नाहीत? असा सवाल देखील बीडकर करत आहेत? हद्द वाढ झाली पण त्यांना घरकुल समवेत कसलीच योजना मिळत नाही? बीड शहर हे घाणीचे साम्राज्य बनले आहे.याकडे नगर पालिकेचे साफ दुर्लक्ष आहे. 
बीड शहरातील  महापुरुषांच्या पुतळ्यची देखभाल हि नगरपालिकेकडून व्यवस्थित होत नाही.अशा अनेक मागण्या शहरातील नागरिक वारंवार करत आहे या कडे दुर्लक्षकरण  करणे चुकीची आहे. यामध्ये सर्वात प्रमुख मागणी असलेली  बीड शहराला पाणी पुरवठा करणारे माजलगाव  व बिंदुसरा धरण पाण्याने भरलेले असताना बीड नगर परिषदे मार्फत बीड शहरात लोकांना दहा ते पंधरा दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. बीड नगर परिषदेच्या आडमुठ्या धोरणामुळे " नदी उशाल,अन  कोरड घशाला " अशा प्रकारची दयनीय अवस्था बीड शहरवासीयांची झाली आहे. कोरोनाच्या काळात स्वच्छता राखावी अशा सूचना केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच बीड नगर परिषद देखील वेळोवेळी करत असताना स्वच्छता राखण्यासाठी पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो ही बाब बीड नगर परिषदेला कदाचित माहित नसावी. दहा ते पंधरा दिवसाला पाणी सोडून कोरोनाच्याच्या संकटाला तोंड कसे द्यावे हे बीड नगरपालिकेने बीड शहरातील लोकांना सांगावे.
वेळोवेळी  शिवसंग्रामने बीड नगर परिषदेला निवेदना मार्फत विनंती केली, आंदोलनाचा इशाराही दिला  तरीही बीड नगरपालिकेच्या निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही यामुळे येत्या  सोमवार, दि. २८ /१२/२०२० रोजी शिवाजी महाराज चौक  ते बीड नगरपालिके वर बीड शहरातील सर्व महिला भगिनींना घेऊन शिवसंग्रामच्या वतीने "हंडा बजाओ आंदोलन" करणार  आहे.  त्यामध्ये सर्वानी उपस्थित राहावे  असे आव्हान  शिवसंग्रामचे जिल्हासरचिटणीस तथा बीड शहर प्रभारी  अनिल घुमरे  यांनी निवेदना मार्फत दिला आहे.
No comments