Breaking News

वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी "जुन्नर पॅटर्न" राबवावा : सुरेश पाटोळे


के. के. निकाळजे । आष्टी 

    महाराष्ट्रासह ग्रामीण भागात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असून पैठण, पाथर्डी बरोबरच आष्टी तालुक्यात तीन व करमाळा तालुक्यात दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. व अनेक व्यक्ती बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक गावात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. अश्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून लोकप्रतिनिधीसह शेतकरी बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मागत आहेत. माझ्या मते बिबट्याला ठार न मारता वनविभागाने सर्व एक्स्पर्ट तज्ञाशी चर्चा करून " जुन्नर पॅटर्न " सारखी विशेष मोहीम राबवून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शिव संघर्ष ग्रुप चे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी वनविभागाचे कर्मचारी यांच्याशी संवाद साधतांना केली आहे. 

      

सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी नुकतीच आष्टी तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन  वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व राबवत असलेल्या मोहीमेची माहिती घेतली. या मोहिमेत अनेक वनविभागाचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेऊन बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनात आले आहे. परंतु बिबट्याला ठार न मारता पकडण्यासाठी प्रयत्न करावेत. 

       

काही दिवसांपूर्वी यवतमाळ मधील 'टी-१ व 'अवनी' वाघिणीला ठार मारल्याचे प्रकार देश पातळीवर आजही गाजत आहेत. पुन्हा ती चूक न करता वनविभागाने "जुन्नर पॅटर्न " सारखी मोहीम राबवून बिबट्याला जेरबंद करावे. या मोहिमेत १०८ बिबट्यांना ठार न मारता जेरबंद करण्यात वनविभागाने कामगिरी केली होती. त्याप्रमाणे मोहीम राबवावी असेही सुरेश पाटोळे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले आहे.


No comments