Breaking News

बिलोली बलात्कार व खून प्रकरणातील आरोपी विरुद्ध नवीन कायद्याखाली कारवाई करा : सुरेश पाटोळे


बीड :  नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मतिमंद मुलीवर बलात्कार करून तिची निरखून हत्या करण्यात आली असून या घटनेतील आरोपी विरोधात दिशा कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करून त्वरित कार्यवाही करा अशी मागणी मानवी हक्क अभियान चे जिल्हा सरचिटणीस व शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्राचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांना केली आहे.

     

पुरोगामी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने नुकताच महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी व संरक्षणासाठी शक्ती व दिशा कायदा अतित्वात आणला आहे. दिनांक ०८/१२/२०२० रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मतिमंद मुलीवर बलात्कार करून तिचा चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करून आरोपीविरुद्ध दिशा कायद्याखाली केस चालवून त्वरीत कार्यवाही करावी. या प्रकरणात कायदेशीर बाबींची त्रुटी राहू नये म्हणून या गुन्ह्याचा तपास निःपक्षपातीपने करण्यात यावा. वाटल्यास विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून बलात्कारी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी. अशी मागणीही सुरेश पाटोळे यांनी गृहमंत्रालयाला केली आहे.


No comments