Breaking News

महंमदबाबा दर्ग्याची शंभर एकर जमीन हडपणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : आष्टी तहसिल कार्यालयासमोर जमिनीच्या मुळ हक्कदारांचं धरणे आंदोलन

डॉ. ढवळे यांच्या नेतृत्वात केलं आंदोलन, तहसीलदार दळवी यांना दिलं मागण्याचं निवेदन

शेख कासम । कडा 

आष्टी तालुक्यातील माैजे रुईनालकोल येथील महंमदबाबा दर्गाह येथील देवस्थानची १०० एकर जमीन बनावट दस्तावेज तयार करुन हडपण्यात आली असून देवस्थानची जमीन लातणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येवून शंभर एकर इनामी जमीन पूर्ववत देवस्थानकडे हस्तांतारीत करण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी आष्टी तहसिल कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. 

माैजे रुईनालकोल येथील महंमदबाबा दर्ग्याची तालुक्यात शेकडो एकर जमीन आहे. त्यापैकी शंभर एकर जमीनचे बनावट दस्तावेज करून हडप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून गुरुवार  डाॅ. ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली इनामी जमिनीचे मुळ हक्कदांराना सोबत घेवून आष्टी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

यावेळी आष्टीच्या तहसीलदार शारदा दळवी ह्या आंदोलनाच्या ठिकाणी आल्या असता त्यांच्याकडे  महंमदबाबा दर्गाह येथील देवस्थानची १०० एकर जमीन बनावट दस्तावेज तयार करुन हडपण्यात आली असून देवस्थानची जमीन लातणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येवून शंभर एकर इनामी जमीन पूर्ववत देवस्थानकडे हस्तांतारीत करण्यात यावी. अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. या आंदोलनात शेख हजरत मंहमद, शेख गुलाब अहमद, शेख हिना अनिस तसेच महिला व पुरुष लहान मुले अंदोलनामध्ये सहभागी झाली होती.


आष्टीत सामाजिक कार्यकर्ते नावालाच 

एरव्ही सामाजिक कार्यकर्ता असल्याचा भास निर्माण करून प्रसिध्दीसाठी उचापती करणाऱ्यांची संख्या कमालीची. मात्र आष्टीत महंमदबाब दर्ग्याच्या जमिनी संदर्भात आंदोलन होत असताना तालुक्यातील स्वतः ला सामजिक कार्यकर्तेची झालर लावून मिरवणारे एकही सामाजिक कार्यकर्ते आंदोलन ठिकाणी फिरकले नाहीत. त्यामुळे आज झालेल्या आंदोलनाने त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांपणाचे बाह्यरुप उघडे पडले असून आष्टीत सामाजिक कार्यकर्ते नावालाच असल्याची चर्चा तालुक्याभर चर्चा होत होती. 
No comments