Breaking News

कडाक्याच्या थंडीत गावकऱ्यांनी केलं रात्रभर नदी पात्रात भजन


जप्त वाळूसाठा प्रकरणी चौकशीसाठी तरुण करतोय नदीपात्रात उपोषण,  आंदोलनास गावकऱ्यांचा मिळतोय पाठींबा

प्रशासनातील वातावरण तापल्याने अधिकाऱ्यांना फुटला घाम... 

बीड : जप्त वाळू साठ्याचा लिलाव न करता मर्जीतील गुत्तेदाराला देण्याचा तुघलकी आदेश रद्द करुन नदी पात्रातील वाळूसाठ्याच्या चोरीची चौकशी करून दोषींवर निलंबनाची करवाई करण्यात यावी. या मागणीसाठी चक्क एक तरुण नदीपात्रात उपोषण करीत आहे. उपोषणस्थळी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत रात्रभर भजन करुन त्या तरुणाच्या आंदोलनात पाठींबा दर्शिवित आम्ही सोबत असल्याचं दाखवून दिलं आहे. यामुळे गेवराईसह जिल्हा प्रशासनातील वातावरण तापल्याने अधिकाऱ्यांना मात्र घाम फुटल्याची चर्चा होत आहे.


कोपरा (ता. गेवराई)  येथील जप्त वाळू साठयाचा वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन देऊनही, खुल्या पद्धतीने वाळूचा लिलाव न करता थेट गुत्तेदाराला वाळूसाठा दिलेला आदेश रद्द करावा व सिंदफना नदीपात्रातून वाळू चोरी गेल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गेवराई, मंडळ अधिकारी, तलाठी यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी नदी पात्रात युवानेते दत्ता जाधव यांनी शनिवारी (दि. १९) उपोषणाला सुरवात केलीय.  या उपोषणात रयत शेतकरी संघटनचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर सहभागी झाले. दिवसभर हे तरुण नदी पात्रात ठाण मांडून बसले. परंतु, सायंकाळी होत असताना गावातील तरुण न्यायासाठी व प्रशासनाच्या तुघलकी भूमिके विरोधात आंदोलन करीत असल्याने उपोषणस्थळी स्टेज व मंडप टाकून देण्यात आला. त्यातच जसजसा अंधार होऊ लागला अन नदी पात्रात समशान शांतता पसरु लागली. 

मात्र महसूल प्रशानाची झोप उडविण्यासाठी आणि अंधारातील प्रकार उजेडात आणण्यासाठी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी दत्ता जाधव यांच्या आंदोलनास पाठींबा दर्शिवित कडाक्याच्या थंडीत उपोषणस्थळी रात्रभर भजन केलं. टाळ- मृदंगाच्या होत असलेला गझराने सिंदफणा नदी पात्र जणू काही भ्रष्ट कारभारा विरोधात लुटारूंना आव्हान देत होते, असाच काहीसा अनुभव गेवराईकरांना येत होता. तरुणांच्या आंदोलनास गावकऱ्यांचे मिळालेले समर्थन आणि कडाक्याच्या थंडीत उपोषणस्थळी झालेलं भजन यामुळं मात्र गेवराईसह जिल्हा प्रशासनामधील वातावरण तापलं असून अधिकाऱ्यांना घाम फुटला असावा अशी चर्चा यानिमित्ताने तालुकाभर होत आहे. 
No comments