Breaking News

भाग्यविधातामुळे शेतकऱ्याची वाजली घंटी....


भाग्यविधातामुळे शेतकऱ्याला मिळाला हरवलेला मोबाईल..!

बीड : शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं तसं काही मिळत नाही. त्याउलट त्याच्याकडं असलेलं ही हिरावून घेतलं जातं. मात्र एका शेतकऱ्याला त्याचा हरवलेला मोबाईल साक्षात भाग्यविधातामुळे मिळाल्याचा प्रत्यय बीडमध्ये समोर आला आहे. यामुळं भाग्यविधाताचं शेतकऱ्यांनं आभार मानलं. शेतकऱ्याचा मोबाईल त्याला मिळाल्यानंतर त्याची घंटी वाजताच शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. 

बीड तालुक्यातील तांदळवाडी येथील शेतकरी लक्ष्मण सानप कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून पाडळसिंगला गेले होते. परतीच्या प्रवासात पाडळसिंग येथील ब्रीज आल्यानंतर  त्यांचा विवो कंपनीचा १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल त्यांच्या खिशातून पडला. परंतु, त्यावेळी त्यांच्या लक्षात आले नाही. घरी पोहचल्यानंतर त्यांच्या खिशात मोबाईल नसल्याचं आल्यानं शेतकरी लक्ष्मण हैराण झाले. शोधा- शोध करुन ही मोबाईल सापडत नसल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. 

दरम्यान बीड शहरातील  भक्ती कन्स्ट्रक्शन येथील शिक्षक भाग्यविधाता जनार्दन साळवे हे गेवराई येथून काम उरकून घरी परतत असताना त्यांना फोन आला असता त्यांनी आपली दुचाकी पाडळसिंग ब्रीजवर थांबवित, फोनवर बोलत असताना त्यांना ब्रीजवरील रस्त्याच्या कडेला एका कोपऱ्यात पांढरी वस्तू चमकत असल्याची दिसली. जवळ जाऊन पाहिल्यानंतर तो मोबाईल असून कोणाचा तरी पडला असावा. म्हणून भाग्यविधाता साळवे यांनी तो मोबाईल उचलून त्यावर डायल केलेल्या नंबरवर संपर्क करून हा मोबाईल सापडल्याची माहिती देत संबधित मोबाईल खात्री करून घेऊन जाण्याचं आवाहन केलं. 

आज भाग्यविधाता साळवे यांनी शेतकरी लक्ष्मण सानप यांना त्यांचा मोबाईल आज सुपूर्द केला. सहसा हरवलेला मोबाईल शक्यतो कोणाला मिळत नाही. मात्र साक्षात भाग्यविधाता यांच्यामुळे हरवलेला मोबाईल शेतकरी लक्ष्मण यांना मिळाल्यानेआभार मानले तर भाग्यविधाता यांनी ही समाधान व्यक्त केलं. सध्या शेतकरी कष्ट सोसत असताना मात्र बीडच्या भाग्यविधाता यांनी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. 


No comments