Breaking News

आष्टी वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. महादेव तांदळे तर उपाध्यक्षपदी ऍड. राम मुटकुळे यांची बिनविरोध निवड

सचिवपदी ऍड. अजय    जोशी,  कोषाध्यक्षपदी ऍड.  संभाजी दहातोंडे, महिला प्रतिनिधी ऍड. नेहा निकाळजे यांची बिनविरोध निवड

 

के. के. निकाळजे । आष्टी

दरवर्षीप्रमाणे वकील संघाच्या वतीने निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न झाली. आष्टी वकील संघाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवड करणे करण्याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये निवडणूक न घेता बिनविरोध कार्यकारणी निवड करण्याचा ठराव संमत करण्यात आला पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी ऍड महादेव तांदळे यांचे नाव सुचविण्यात आले त्यांना कुणीही विरोध न करता त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी ऍड राम मुटकुळे,  सचिव पदी ऍड अजय जोशी,  कोषाध्यक्षपदी ऍड संभाजी दहातोंडे महिला प्रतिनिधी ऍड नेहा निकाळजे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. 

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ऍड काशिनाथ फुंदे, ऍड साहेबराव म्हस्के,ऍड बी. एम गर्जे,  ऍड एस के गव्हाणे, ऍड के एन गव्हाणे, ऍड आदिनाथ पोकळे, ऍड अनारसे, ऍड सय्यद ताहेर, ऍड पारखे,ऍड विजय ढोबळे, ऍड अविनाश निंबाळकर, ऍड झांबरे,ऍड व्ही. एच.शेकडे, ऍड ए.बी.शिंदे, ऍड मोहनराव खेडकर, ऍड एस.टी.देशपांडे यांनी परिश्रम घेतले. या बैठकीला वकील संघांचे सदस्य ऍड लगड, ऍड झगडे,ऍड डी. एस. ससाणे, ऍड अस्वर, ऍड गवारे, ऍड तवले, ऍड डी. सी. शेख,ऍड बी.वी. दाणी, ऍड बी.आर. खिल्लारे,  ऍड बाळासाहेब मोरे, ऍड बी.बी. गर्जे, ऍड  इरफान पठाण, ऍड गौतम निकाळजे, ऍड शार्दुल जोशी, ऍड यु.आर. पोकळे, ऍड कुलकर्णी, ऍड टी. एच. सय्यद,ऍड नवनाथ शेकडे, ऍड मोहिते, ऍड किशोर निकाळजे,आदी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना वकील संघांचे मावळते अध्यक्ष ऍड विनोद निंबाळकर यांनी केले. तसेच सूत्रसंचालन ऍड एस. बी. पवार यांनी केले. शेवटी आभार ऍड झांबरे यांनी मानले.


No comments