Breaking News

मुंडे साहेबांनी माणसं उभी केली हेच आमचं वैभव- खा. प्रितमताई मुंडे

 


प्रीतमताईंच्या हस्ते  भगवान मेडिकलचे उदघाटन 

गौतम बचुटे । केज  

दिवंगत मुंडे साहेबांवर प्रेम करणारे सर्वजनांना साहेबांसोबत काम करता आले हे सौभाग्य असून हे खरे आमचे वैभव आहे अशी भावना खा. प्रितमताई मुंडे यांनी केज येथील दत्तात्रय धस यांच्या चिरंजिवांच्या मेडिकल स्टोअर्सच्या उदघाटन प्रसंगी केले.


केज येथील भाजपचे जेष्ठ नेते तथा जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय धस यांच्या चिरंजिवानी वैद्यकीय व औषधी व्यवसायात पदर्पण केले आहे. दि. ११ रोजी केज येथील शिवाजी चौकात खा. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते व ह.भ.प. रतन महाराज, ह.भ.प. लाड गुरुजी, ह.भ.प. केशव शास्त्री सारुक महाराज, ह.भ.प. हरिहर महाराज, ह.भ.प. केशव शास्त्री घुले महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने तसेच अक्षय मुंदडा, रमेशराव आडसकर, सभापती सौ. परिमळा घुले, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, डॉ . योगिनी थोरात, रमाकांत मुंडे, राकाँचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोराळे, पशुपतीनाथ दांगट, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रत्नाकर शिंदे, डॉ. नेहरकर, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, भगवान सेनेचे मुरलीधर ढाकणे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 

यावेळी पुढे बोलताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की समाजसेवा आणि राजकारण करताना कार्यकर्त्यांनी व्यवसायात उतरून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला हवे. तरच आपण इतरांना वेळ प्रसंगी मदत करू शकू. त्या दृष्टीने दत्तात्रय धस आणि त्यांच्या कुटुंबांनी उचलले हे पाऊल स्वागतार्ह आहे. त्यांच्या व्यवसायाची भरभराट होवो. अशा शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यात असलेल्या रक्त तुटवड्याची दखल घेत त्यांनी कार्यकर्त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करीत असताना मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे आयोजित करून रक्त संकलन करण्याचे देखील कार्यकर्त्यांना आवाहन केले. या कार्यक्रमास दत्तात्रय धस आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेम असणारे सर्व स्तरातील विविध पक्ष, संघटना, व व्यासायिक यांच्यासह सामान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रर्माचे सूत्रसंचलन रामयनाचार्य मारोती घुले सर यांनी तर आभार दत्तात्रय धस यांनी व्यक्त केले.

उदघाटन आणि लग्नाचा वाढदिवस एक योगायोग 

 ११ डिसेंबर हा धस यांच्या मेडिकल स्टोअर्सचे उदघाटन व प्रितमताई मुंडे यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने धस कुटुंबियांनी केक कापून खा. प्रितमताई मुंडे यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.No comments