Breaking News

बिबट्याचा पुन्हा हल्ला,हल्ल्यात शेतकरी जखमीघटनास्थळी आमदार सुरेश धस यांनी दिली भेट

 

आष्टी : बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा आष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथे शेतात पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्यात सुदैवाने शेतकरी बालंबाल बचावला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी जावून भेट दिली. 

आष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथील शेतकरी विकास झगडे हे आपल्या ज्वारीच्या शेतात पाणी देत असताना त्यांच्या वर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात ते जखमी झाले.त्यांनी तात्काळ प्रतिकार केल्याने बिबट्या पुन्हा ज्वारीच्या शेतात पसार झाल्याची माहिती मिळाली. घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी शेताला वेढा टाकला असून  शोध मोहीम सुरू आहे. झगडे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी शेतकऱ्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. No comments