Breaking News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा - जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर


गौतम बचुटे । केज 

आपल्या न्याय व रास्त मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

या बाबतची माहिती अशी की, पंजाब हरियाणा राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागणीसाठी सुरू असलेल्याया शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करीत  बीड जिल्हा स्वाभिमानी शेतकरी जाहिर पाठींबा असलल्याचे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर यांनी केज तहसीलदार यांना दिले आहे. 

या वेळी त्यांच्या सोबत आदिवासी विकास आघाडीचे मराठवाड्याचे अध्यक्ष भागवत पवार हे होते निवेदनात जिल्हयातील शेतकऱ्यांना दिवसाचा विद्युत पुरवठा करावा. त्या मुळे शेतकऱ्यांचा रात्री संकटांचा त्रास होणार नाही. तालुक्यातील बँकानी शेतकऱ्यांना खरिप पीक कर्ज वाटपात फार मोठा घोटाळा केला आहे. त्याची चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच अद्यापही शेतकरी पिक कर्जा पासून वंचीत आहेत.असाही उल्लेख निवेदनात केला आहे. निवेदनावर अशोक गित्ते, दत्ता गुंड, सय्यद जमिल पटेल, मूज्जूभाई फारोकी यांच्या सह्य आहेत.


No comments