येडेश्वरी वाहन वजन काट्याची तपासणी : योग्यतेचं दिलं वैधमापन प्रमाणपत्र
गौतम बचुटे । केज
तालुक्यातील येडेश्वरी कारखान्याच्या वाहन वजन काट्यास तपासणी पथकाने अचानक भेट देत वजन काट्याची वैधमापन शास्र पध्दतीने बीडचे वैधमापन शास्र निरिक्षक ए. दराडे, के.के. थोरात, लेखापरिक्षक श्रेणी यांनी तपासणी केली. तपासणीमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून आल्या नसल्याने वजन काटा योग्य असल्याचे प्रमाणपत्र येडेश्वरी कारखान्यास वैधमापन पथकाने दिले आहे.
कारखान्याचा वजन काटा सुस्थितीत आणि प्रमाणित असल्याचे प्रमाणपत्र यावेळी तपासणी पथकाने ऊस उत्पादक शेतक-यांच्या साक्षीने दिले. येडेश्वरी साखर कारखान्याच्या वाहन वजन काट्याची तपासणी बाबत कोणतीही तक्रार नसताना केवळ शासन आदेशानुसार विशेष पथकाने कारखान्यावर जाऊन वजन काट्याची तपासणी केली. या तपासणीमध्ये कोणताही गैरप्रकार अथवा त्रुटी आढळून न आल्यामुळे पुन्हा एकदा येडेश्वरी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतक-यांचा विश्वास संपादन केला आहे. या वेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन कल्याण शिनगारे, शेकापचे नेते मोहनभाई गुंड, कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण शिंदे, शिवाजी पाटील, सचिन कुमार देशमुख, गणेश पवार व कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
No comments