Breaking News

सुमन कुलकर्णी यांचे निधन


बीड : 
येथील भक्ती कन्स्ट्रक्शन भागात राहणार्‍या सुमन सखाराम कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या.

बीड आणि जालना जिल्ह्यात शिक्षक म्हणून सेवा केलेल्या सुमन कुलकर्णी या मनमिळावू स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या.शेकडो विद्यार्थी घडवण्याचे काम त्यांनी केले,एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा नावलौकिक होता पंधरा दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते,उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती सखाराम कुलकर्णी, दोन मुले, मुलगी, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे.

No comments