Breaking News

गोविंदवाडी ग्रामपंचायत बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात


नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अमरसिंह पंडित यांच्या हस्ते सत्कार

गेवराई :  तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे बिगुल वाजले असतांना गोविंदवाडी ग्रामपंचायत बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित गटाने श्रीगणेशा केला आहे, आज अमरसिंह पंडित यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रारंभीच अमरसिंह पंडित यांच्या तगड्या नियोजनामुळे राष्ट्रवादीला विजयी सलामी मिळाली असून मौजे गोविंदवाडी ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार प्रभाग क्रमांक १ मधून सौ. कल्पना अच्युत मराठे, बाबुराव हरिभाऊ मोरे व  कारभारी साहेबराव बिचकुले तसेच प्रभाग क्रमांक २ मधून सौ. किसकिंदा बाबा शिंगाडे, सौ. द्वारका बाबुराव कदम आणि प्रभाग क्रमांक ३ मधून सौ. आरती आशोक हातागळे व  अविनाश प्रल्हाद आडे यांच्या विरोधात कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या निवडणूकित राष्ट्रवादीचे सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले. गुरुवार दि. ३१ डिसेंबर रोजी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.  यावेळी गेवराई पंचायत समितीचे माजी  उपसभापती डॉ. आसाराम मराठे, अच्युत मराठे, देवराव बिचकुले, तुकाराम नरवडे, गणेश मोरे, देव मराठे, नितीन पेजगुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाथरवाला बु. येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

पाथरवाला बु. येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते बदाम मस्के, भागवत सोनवणे, अनिरुद्र सोनवणे, भागवत मस्के, मोहन मस्के, बबलू मस्के, शिवाजी पारे, वसंतराव मस्के आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र  करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सरपंच सुनील पारे, रविंद्र खोसे, गंगाधर हाके, गणेश वाडघाने, वाचिष्ट घमाट सह आदी उपस्थित होते.
No comments