Breaking News

नवीन मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत शिवनेरी प्रतिष्ठानचे वैजनाथ माने यांचे आवाहनपरळी वैजनाथ : शहरात व तालुक्यातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी आपले नावे हे मतदार यादीत नोंदवावीत असे आवाहन शिवनेरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैजनाथ माने यांनी केले आहे.

          

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाने दि. 15 नोव्हेंबर पासून नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू केले आहे. याकरिता नवीन मतदारांनी आपले आधार कार्ड , जन्म दाखला (टी.सी.) पासपोर्ट साईज फोटो वडील आई यांचे मतदान कार्ड व सहा नंबरचा फॉर्म सोबत जोडणे आवश्यक आहे सदरील कार्यक्रम मंगळवार दि. 15 डिसेंबर रोजी पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. तरी लोकशाहीचे हात बळकट करण्यासाठी नव युवक-युवतींनी आपले 18 वर्ष पूर्ण झालेले असलेल्या असलेल्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी तहसील कार्यालय व आपल्या भागातील बुथावर जाऊन येथे संपर्क साधावा. शहर व तालुक्यातील सर्व नव युवक-युवतींनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे हे असे आवाहन शिवनेरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैजनाथ माने यांनी केले आहे.No comments