Breaking News

आ. बाळासाहेब आजबे यांच्या सूचनेनंतर त्या बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव विभागीय अधिकार्‍याकडे दाखल

 

के. के. निकाळजे । आष्टी

 आष्टी वनपरिक्षेत्र अंतर्गत गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून बिबट्याने हाहाकार माजवला आहे मतदारसंघातील जनतेचा विचार करता आ. बाळासाहेब आजबे यांनी वनमंत्रीसंजय राठोड  व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्याला ठार मारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती त्यासंबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी आष्टी  यांना सूचित करून आष्टी तालुक्यात व इतर ठिकानी घडलेल्या  घटनेची सविस्तर माहिती देत  आष्टी या परिसरातील बिबट्यास पिंजरा बंद करण्यास, बेशुद्ध करून पकडण्यास व हे दोन्ही पर्याय शक्य न झाल्यास त्याचा शोध घेऊन ठार मारण्याची परवानगी मिळणे बाबतचा प्रस्ताव आ.आजबे  व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या सही निशी विभागीय वन अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

      

वनपरिक्षेत्र आष्टी अंतर्गत दिनांक 24 नोव्हेंबर 2020 रोजी सुरुडी तालुका आष्टी जिल्हा बीड येथील  नागनाथ गर्जे शेतात पिकाला पाणी देत असताना दुपारी तीन ते चार दरम्यान दरम्यान बिबट्या वन्यप्राणी हल्ला करून ठार मारले शरीरावरील  बहुतांशी भागखाल्याचे  दिसून आले तसेच 27 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान  किनी येथे तलावाच्या परिसरात स्वराज्य भापकर वय वर्षे दहा यास बिबट्याने उचलून नेले व त्याचेही मान व कानाजवळ काही भाग खाल्ले  दिनांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी मंगरुळ तालुका आष्टी येथे श्रीमती शालनबाई दिंडी वय तीस वर्ष यांच्यावरील बिबट्यानेहल्ला करून मानाचा चावा घेत मोठी दुखापत केली या ठिकाणीही बिबट असल्याचे खात्रीलायक समजले त्यानंतर 29 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी अकराच्या दरम्यान शालन बाई भोसले व पुतण्या विजय भोसले राहणार पारगाव हे खुरपणी करत असताना यांच्यावरील बिबट्याने हल्ला केला व मानेला चावा घेत गंभीर जखम केली त्यानंतर दिनांक 29 11 2020 रोजी पारगाव जोगेश्वरी येथे बळे वस्तीजवळ सुरेखा नीळकंठ बळे या महिलेवर साडेपाच 5:30 च्या दरम्यान हल्ला करत या महिला ठार केले व शरीरावरील छातती, मान चेहऱ्यावरील मास खाल्याचे  निदर्शनास आले. 

यापूर्वीही दिनांक 21 11 20 रोजी तालुक्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगड तांडा याठिकाणी महिलेवर हल्ला करून त्यामध्ये मरण पावल्याची  माहिती आहे व 16 11 2020 रोजी पाथर्डी जवळ तालुक्यात पैठण तालुक्यातील वडील व मुलगा अशा दोन व्यक्तीवर बिबट्या वन्यप्राण्यांनी हल्ला करून त्यांना ठार केले होते या सर्व बाबी लक्षात घेता यापुढेही या परिसरातील जनतेला प्राण्यापासून जीवितास धोका असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे तात्काळ विभागीय वन अधिकारी यांनी या बिबट प्राण्यास ठार मारण्याचे आदेश द्यावेत असा प्रस्ताव तयार करून त्यावर आमदार बाळासाहेब आजबे व वनपरिक्षेत्राधिकारी आष्टी एस आर शिरसाट यांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव विभागीय कार्यालयात दाखल करण्यात आला आहे.

सोलेवाडी येथे आ.आजबे उतरले शोधमोहिमेत 

गुरुवार दि 3 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आष्टी पासून जवळच असलेल्या सोलेवाडी येथे शेतकरी विकास झगडे या शेतकर्‍यावर बिबट्याने  हल्ला केल्याचे समजताच या ठिकाणी तात्काळ आ. बाळासाहेब आजबे यांनी भेट दिली अधिकाऱ्यांना याठिकाणी ज्वारीच्या पिकामध्ये बिबट्या असल्याच्या संशय आल्याने  वन विभागाचचे अधिकारी, कर्मचारी समवेत आ. आजबे ही स्वतः शोधमोहिमेत उतरले. व नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याच्या याप्रसंगी सूचना  देत आधार दिला.


No comments