केजच्या फुले नगरमध्ये नाल्या तुंबल्या
सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे दुर्गंधी आणि ये-जा करण्यास नागरिकांना त्रास
गौतम बचुटे । केज
शहरातील फुले नगर भागातील नाल्या तुंबल्या असून त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज शहरातील फुले नगर भागात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची दयनीय अवस्था झाली असून नाल्या तुंबल्यामुळे त्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहात आहे. त्यामुळे परिसरात घाण आणि दुर्गंधी पसरत आहे. या बाबत येथील रविवाशी तात्या गवळी यांनी नाल्या व रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. दरम्यान केज नगर पंचायतीवर प्रशासक नियुक्त असून या बाबत आता प्रशासक यांनी कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.
No comments