बीड शहरातील बार्शी नाका येथून जाणाऱ्या इमामपूर रस्त्याचे अर्धवट काम तात्काळ सुरु करा - सुधीर काकडे
येत्या ८ दिवसात सुरु न केल्यास शिवसंग्राम आंदोलन करणार- सातीराम ढोले
बीड : शहरातील बार्शी नाका येथून इमामपूर ला जोडणाऱ्या रस्त्याचे काम हे गेल्या ६ महिन्यापासून बंद असून ते अर्धवट सोडल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास देण्यासाठी ते काम बंद ठेवले आहे का ? असा सवाल शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी केला आहे. इमामपूर रस्ता हा अनेक गावांचा मुख्य रस्ता असून यामध्ये नेकनूर सारखी मोठी बाजारपेठ या रस्त्याने जोडली जाते कारण हा जवळचा मार्ग आहे. तसेच श्री क्षेत्र चाकरवाडी येथे माउली भक्तांना दर्शना साठी जाणयासाठी याच मार्गाचा वापर करतात. या वेळी या रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे रहदारी मध्ये अडथळा निर्माण होऊन रस्त्यावरून जाणाऱ्या माता-भगिनी, लहान मुलांना जाण्या येण्याकरिता त्रास सहन करण्याची वेळ येत आहे. तसेच या ठिकाणी अनेक वेळा घाणी मध्ये पाय घसरून व मोटार सायकल घसरून पडल्यामुळे नागरिक जखमी झाले आहेत. घटना देखील घडलेल्या आहेत. त्याठिकाणी दररोज किमान २ तरी अपघात होत आहेत तरी नगरपालिका मूग गिळून गप्प का आहे?
या संदर्भात येत्या ८ दिवसात काम सुरु न केल्यास शिवसंग्राम आंदोलन करणार असल्याचे शिवसंग्रामचे नेते सातीराम ढोले यांनी इशारा दिला आहे या वेळी शिवसंग्रामचे सरचिटनिस तथा बीड शहर प्रभारी अनिल घुमरे, सुहास पाटील, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, बीड शहर शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे, सतीराम ढोले, दत्ता गायकवाड, बळीराम थापडे, मनोज जाधव,कैलास शेजाळ, लाला भाई, अक्षय माने, अशोक ढोले, सुशांत सतराळकर, विजय सुपेकर, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
No comments