Breaking News

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसंग्राम आयोजित रक्तदान शिबीर व स्वच्छता अभियानासह विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हा - दत्ता गायकवाड, नितीन आगवान, सातेराम ढोले, सुनील धायजे


बीड :   शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीड शहरात महारक्तदान शिबीर, स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. हि सर्व उपक्रम टप्प्याटप्याने आयोजित करण्यात येणार आहेत. अशी माहिती शिवसंग्राम माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, नितीन आगवान, सातिराम ढोले, व शिवसंग्राम सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस सुनील धायजे यांनी दिली आहे.
    

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीड शहरात दि ०५ डिसेंबर रोजी स्वच्छता अभियान हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी ८ वाजल्यापासून राबविण्यात येणार आहे. महारक्तदान शिबीर हे महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी चमन गार्डन परिसरात, भीमसृष्टीच्या नजीक सकाळी ८ वाजल्यापासून आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदानात सहभाग घेऊ  इच्छिणाऱ्यांनी ७५१७६०६१५८/८९५६४६१५७३ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करायची आहे.  
    

सर्व  उपक्रमांमध्ये कोरोनापासून बचावाची खबरदारी घेण्यात येणार आहे. शिवसंग्राम, बीडच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, स्वच्छता मोहिमेत बीडकरांनी यावे असे आवाहन शिवसंग्राम माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, नितीन आगवान व शिवसंग्राम सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस सुनील धायजे यांनी केले आहे. 

No comments