Breaking News

विनयभंगाची तक्रार मागे घे म्हणून पीडितेला केली मारहाण

गौतम बचुटे । केज 

विनयभंगाची तक्रार मागे घे म्हणून केज तालुक्यातील मुंडेवाडी येथे एका ३१ वर्षीय विवाहितेला मारहाण करून तिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २९ डिसेंबर २०२० रोजी फिर्यादी महिलेच्या मुंडेवाडी ता. केज येथे शेतातील घरात रात्री ८:३० वा. च्या सुमारास देविदास घोळवे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच्या विरुद्ध पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी विनयभंगाची केलेली तक्रार मागे घे. अशी मागणी त्याने केली. जर तक्रार मागे घेतली नाही तर तिला व तिच्या नवऱ्याला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. ५५८/२०२० भा.दं.वि. ४५२, ३२३, ५०८ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकुंद ढाकणे हे करीत आहेत.

No comments