Breaking News

कलेक्टर साहेब वाळू चोरीचे लोकांनी पाठविलेली माहिती वाळू माफियाकडे जातेच कशी ?

प्रतिकात्मक

वाळू उपसा करणाऱ्यांनी तक्रारदारालाच फोन करून केली वाळू उपसा सुरू करू देण्याची मागणी

गौतम बचुटे । केज 

तालुक्यातील अवैद्य वाळू उपासा करणारे हे निर्ढावलेलं असून त्यांनी वाळू उपसा प्रकरणी तक्रार करणाऱ्या एका तक्राररादारालाच आम्ही वरच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करतो; पण तुम्ही तक्रार करू नका. आम्हाला वाळू उपसा करू द्या. असे फोन करून एक प्रकारे विनंतीवजा धमकी दिली आहे.

या बाबतची माहिती अशी की, मागील काही महिन्या पूर्वी केज तालुक्यातील बोभाटी नदीवर बेलगाव, आरणगाव, काळेगाव, पिंपरी, वरपगाव ठिकाणी सतत अवैद्य वाळू उपसा चालू होता. या बाबत समाजसेवक प्रताप दातार यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला निवेदनाद्वारे माहिती देऊन कळविले होते. तसेच या बाबत अनेक वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित झाले होते. यामुळे अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या लोकांनी चिडून प्रताप दातार यास मारहाण देखील केली होती. मारहाण करणाऱ्यांवर केज पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचा गुन्हा सुद्दा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे काही काळ या परिसरातील वाळू उपसा काही अंशी बंद झाला होता.

दरम्यान पुन्हा या परिसरातील वाळू माफियांनी डोके वर काढले असून प्रताप दातार यांना फोन करून आम्हाला वाळू उपसा करू दे. आमचे सर्व अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. असे म्हणून धमकी दिली जात आहे. तसेच या बाबत प्रताप दातार याने अवैद्य वाळू उपसा होत असल्याच्या क्लिप तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माहिती देण्यासाठी पाठविल्या असता त्याची माहिती तात्काळ वाळू माफियांना मिळतेच कशी? कारण लागलीच नदी पात्रातून वाळू उपसा करणारी यंत्रणा गायब केली जात आहे. तसेच काही वाळू माफिया हे आमच्या वाहनांची माहिती जर का दिली तर गय केली जाणार नाही. कारण आमचे वरपर्यंत लागेबांधे आहेत. असे म्हणून विनंती वजा धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी दातार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीकडे केली असून सर्व कॉल रेकॉर्डिंग्ज क्लिप्स त्यांच्याकडे असल्याचे देखील त्यांनी कळविले आहे.




No comments