Breaking News

आष्टी शहराच्या लोकसंख्येचा मेळ बसेना..!


* तहसील आणि नगरपंचायत प्रशासनाची वेगवेगळी आकडेवारी
 

* नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर आष्टी वासी यांमध्ये संभ्रम

* दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

के. के. निकाळजे । आष्टी  

2011च्या जनगणनेनुसार आष्टी शहराची लोकसंख्या किती आहे. याची माहिती एका कार्यकर्त्याने तहसील कार्यालयाकडे माहिती अधिकारातून मागितली होती. तहसील कार्यालयाकडून लोकसंख्येचा मिळालेला आकडा आणि नगरपंचायत कडे असलेला आकडा याच्यामध्ये तफावत असल्याचे दिसून आले. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर ही गोष्ट उघड झाल्याने आष्टी वासी यांनी मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी निर्माण सेनेच्या शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.


        याबाबत तहसीलदार आष्टी यांना दिलेल्या निवेदनात दरेकर यांनी म्हटले आहे की, आष्टी शहराचे 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या नेमकी किती होते. याबाबत आष्टी नगरपंचायत चा तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती मंजुषा गुर्मे यांच्याकडे विचारले असता दि. 9 नोव्हेंबर 2018 रोजी दिलेल्या माहितीनुसार आष्टी शहराची लोकसंख्या 12 हजार 146 इतकी आहे. तर शेख नाजिम रशीद यांनी तहसील कार्यालय आष्टी यांच्याकडे दिनांक 27 जुलै 2020 रोजी आष्टी शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार ते प्रमाणपत्र मागितले होते. त्यानुसार आष्टी तहसील कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनुसार आष्टी शहरातील लोकसंख्या 11 हजार 972 येवढे असल्याचे दिसून आले.  नगरपंचायत आष्टी आणि तहसील कार्यालय आष्टी या दोनही कार्यालयाकडे आष्टी शहरातील लोकसंख्येचे वेगवेगळे आकडे आहेत. या दोन्ही कार्यालयाच्या आकडेवारीनुसार 174 लोकसंख्येची तफावत दिसून येते. ऐन नगरपंचायतीच्या तिच्या तोंडावर आज ती शहरातील लोकसंख्येचा मुद्दा समोर आल्याने आष्टी शहरवासीयांनी मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. होऊ घातलेली आष्टी नगरपंचायत  निवडणूक ही कोणत्या लोकसंख्येच्या आधारे घेण्यात येणार आहे जनतेसमोर यावे. तसेच आष्टी शहराची खोटी लोकसंख्या दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केली आहे.No comments