Breaking News

शेतकरी आंदोलनाची आज सर्वोच्च न्यायालय ठरवणार दिशा


कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम

दिल्ली : कृषी कायद्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील तिढा काही सुटायचं नाव घेत नाही. शेतकरी जिथे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांवर ठाम असून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. अशातच केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे की, ते नव्या कृषी कायद्यांमध्ये काही बदल करु शकतात, पण ते रद्द करु शकत नाही. दरम्यान, दिल्लीच्या बॉर्डरवर गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन करणारे शेतकरी आणि सरकारच्या या लढाईत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या वेशीवर सुरु राहणार की, त्यांनी दुसऱ्या स्थळी हलवण्यात येईल, याबाबत देशाचं सर्वोचं न्यायालय आपला निर्णय देणार आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीच्या सीमांवर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी करण्यात येणार आहे. सर न्यायाधीश एस ए बोबडे, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि जस्टिस वी रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी केली जाणार आहे.




No comments