Breaking News

भाजीपाला आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करु - लुगडे महाराज


परळी :  येथील भाजीपाला खरेदी-विक्री आडत व्यापाऱ्यांकडून अनधिकृतपणे शेतकऱ्यांची लुट होत असून ती लुट शेकडा दहा टक्के असून पणन/कृषी उत्पन्न बाजार समिती/ आडत 2014च्या आदेशानुसार शेतकऱ्यांकडून कसल्याही प्रकारची विक्री मूल्य घेऊ नये अशा पद्धतीचा शासन आदेश असताना परळी येथील भाजीपाला व्यापारी अनधिकृतरित्या कमिशन वसूल करत आहेत ही वसुली चार दिवसात थांबवली नाही तर संभाजी ब्रिगेड स्टाईल उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची महिन्याला लाखोंच्या घरात आडत व्यापार्‍यांकडून लूट झालेली आहे आणि आजही होत आहे. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही अडत व्यापारी हे धाडस कोणाच्या आशीर्वादाने करत आहेत असा सवाल संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे .ही शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे अगोदरच शेतकऱ्यांवर सतत निसर्गाचा कोप झालेला असून मालाला न मिळालेला योग्य भाव यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. 

त्यात गेल्या अनेक वर्षापासून. परळीचे भाजीपाला आडत व्यापारी हे अनधिकृत रित्या शेतकऱ्यांची शेकडा दहा टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत ही लूट चार दिवसात नाही थांबली तर शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे .या संबंधीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने परळी येथील सहाय्यक निबंधक कार्यालय, परळी कृषी उत्पन्न बाजार समिती, परळी व तहसील कार्यालय परळी यांना  देण्यात आले.याप्रसंगी निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज सामाजिक कार्यकर्ते शिवश्री सेवकराम जाधव ,शिवश्री पवन माने, आदी उपस्थित होते.
No comments