Breaking News

धारूर तालूका मराठी पञकार परीषदेच्या किल्ल्यातील परप्रांतीय मजूराना उबदार ब्लॅंकेटचे वाटप


जगदीश गोरे । किल्लेधारूर

धारूर येथील किल्ल्यात काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराना नववर्ष व दर्पण दिना निमीत्त धारूर तालूका मराठी पञकार परीषदेच्या वतीने थंडी मुळे उबदार ब्लाॕकेट चे वितरण करण्यात आले.

धारूर तालूका मराठी पञकार परीषदेच्या वतिने नव वर्षा निमीत्त व दर्पण दिना निमीत्त सप्ताहा भरात विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यांची सुरूवात धारूर येथील ऐतीहासीक किल्ल्यात कामा करता आलेले परप्रांतीय मजूराना सध्याचे थंडीचे काळात मदत व्हावी व बालगोपाळा सह थंडी पासून बचाव करता यावा म्हणूण त्यांना ब्लाॕकेट चे वितरण करण्यात आले. हे मजूर किल्ल्यात उघड्या वर राहत असल्याने थंडीचे दिवसात त्यांना मदतीची गरज होती. त्यामुळे तालूका मराठी पञकार परीषदेचे वतीने या मजूराना ब्लाॕकेट चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरूवात दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर यांचे प्रतीमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. आठवडा भरात दर्पण दिना निमीत्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुरातत्व विभागाचे अभियंता नितीन चारूळे, जलदूत विजय शिनगारे, मराठी पञकार परीषदेचे राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, जिल्हाउपाध्यक्ष सय्यद शाकेर, जिल्हा संघटक हरिभाऊ मोरे तालूकाध्यक्ष महादेव देशमूख, सचिव अतुल शिनगारे,  राम शेळके, ईश्वर खामकर,.आतीक मोमीन, रवि गायसमूद्रे, सतिश पोतदार, गोवर्धन बडे, दिनेश कापसे, शेख इरफान आदि उपस्थित होते.


1 comment: