Breaking News

बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंगचे खासदार प्रीतमताईंनी केलं कौतुक !

 


 

बीड : जिल्ह्याच्या खा.डॉ. प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांनी शुक्रवारी बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंगला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक भगीरथ बियाणी, संचालक प्रविण बियाणी, टीम मेंबर ओम कोटूळे यांनी त्यांचा सत्कार केला.


यावेळी खा. डॉ.प्रीतमताईनी बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंगच्या शैक्षणिक प्रणालीचे आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले. ज्यावेळी बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंगच्या क्लासरूम मध्ये खा. डॉ.प्रीतमताईनी पाय ठेवला त्यावेळी त्यांनी त्यांच्या शालेय आठवणींना देखील उजाळा दिला. सर्व अद्यावत प्रणाली बद्दल उत्साहाने माहिती घेत बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंगच्या टीमला आणि विद्यार्थ्यांना भविष्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या.No comments