Breaking News

आष्टीत माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालयात स्व.अटल बिहारी वाजपेयी जयंती साजरी


पंतप्रधान मोदी यांच्या शेतकरी संवाद कार्यक्रम कार्यकर्त्यांनी पाहीला

के. के. निकाळजे । आष्टी 

आष्टी येथे भाजपनेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालयात देशाचे दिवंगत पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंतीनिमित्त सुशासन दिन साजरा करण्यात आला.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशातील शेतकरी बांधवाबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. हा कार्यक्रम माजी आ.भीमराव धोंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकञीत पाहीला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.हनुमंत थोरवे, अॅड. साहेबराव म्हस्के, जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.महादेव तांदळे, शंकर देशमुख, पप्पु  गर्जे, रघुनाथ शिंदे, सरपंच महादेव कोडे, तात्यासाहेब कदम, बाळासाहेब शिंदे, भीमराव विधाते, बाबु कदम, जाकेर कुरेशी, ज्ञानेश्वर चौधरी, राजुसेठ रासकर, कैलास दरेकर, भीमराव विधाते, रोहीत दुशी आदी उपस्थित होते.


No comments