चर्हाटा परिसरात बिबट्या नाही -वन अधिकारी मुंडे
बीड : आष्टी तालुक्यामध्ये नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेेले आहे. आज सकाळी चर्हाटा येथील एका महिलेवर हल्ला झाला. हा हल्ला बिबट्याचा झाला असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. मात्र हा हल्ला बिबट्याचा नसून इतर प्राण्याचा आहे. चर्हाटा परिसरात बिबटा नसल्याचा दावा विभागीय वन अधिकारी मुंडे यांनी केला आहे.
नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुक्यातील तिघा जणांचा बळी घेतल्यानंतर जिल्ह्यातील शेतकर्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतामध्ये गेलेल्या एका 35 वर्षीय महिलेवर एका प्राण्याने हल्ला केला. सदरील हा हल्ला बिबट्याने केला असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले मात्र हा हल्ला बिबट्याचा नसून इतर प्राण्यांचा असल्याचा दावा विभागीय वन अधिकारी मुंडे यांनी केला असून चर्हाटा परिसरामध्ये बिबटा नसल्याचे मुंडे म्हणाले.
No comments