Breaking News

तुळजाभवानी अर्बनच्या दिनदर्शिकाचे सभापती जयसिंह सोळंके यांच्या हस्ते अनावरण

बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

सभासदांना अत्याधुनिक व आर्थिक सेवा पुरवण्या बरोबरच सामाजिक कार्यातही एक पाऊल पुढे असणाऱ्या तुळजाभवानी अर्बनच्या सन 2021 साठीच्या दिनदर्शीकेचा अनावरण सोहळा आज दि.22 डिसेंबर 2020, मंगळवार रोजी जिल्हा परीषदेचे बांधकाम सभापती जयसिंह भैय्या सोळंके यांच्या हस्ते  संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे ठिकाणी पार पडला.  
          
या प्रसंगी बोलतांना जयसिंहभैय्या  यांनी संस्था राबवत असलेल्या विवीध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत प्रकाशीत केलेली दिनदर्शीका दर्जेदा असुन यामध्ये विविध दिनविशेष दिलेले असल्यामुळे विद्यार्थी तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या ज्ञानात भर पडणार असल्याचे सांगीतले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांनी या वेळी संस्था मुस्लीम सभासद बांधवांसाठी उर्दु (काबा) कॅलेंडर, विजयादशमी निमीत्त चक्रवर्ती सम्राट अशोक यांची प्रतीमा, दिपावली निमीत्त लक्ष्मीपुजनासाठी लागणारा लक्ष्मीचा फोटो तर आता नविन वर्षा निमीत्त दिनदर्शीका अश्याप्रकारचे एक ना अनेक उपक्रम राबवत असते असे सांगीतले. 
या वेळी कार्यक्रमास नगराध्यक्ष शेख मंजुर भाई, जि.प.समाजकल्याण सभापती कल्याणराव आबुज,  जि.प.सदस्य गवते सर, जि.प.सदस्य शरदजी चव्हाण, मार्केट कमीटी संचालक वैजेनाथराव जाधव, नगरसेवक भागवतराव भोसले, नगरसेवक राहुलजी लंगडे, गितारामजी अनभुले, नारायणराव भले, पवणराजे सोळंके, शंतनु सोळंके, तुळजाभवानी अर्बनचे सहा. मुख्यकार्यकारी अधिकारी अशोकराव शेजुळ, विभागीय अधिकारी नवनाथजी शिंगणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे प्रशासकिय अधिकारी अशोकजी मगर यांनी केले तर आभार सहा.मुख्यकार्यकारी अधिकारी सुमितजी शेंडगे यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला. 
No comments