Breaking News

बायकोनं विष घेतल्यानंतर नवऱ्यानं गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले


परळी : बायकोनं विष घेतल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नवऱ्यानं गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील पांगरी कॅम्प घडली. या घटनेनं परळीत खळबळ उडाली आहे.  दरम्यान नवरा- बायकोनं अचानक हे टोकाचं पाऊल का उचलल याचा तपास पोलिस करतायत. प्रियंका पंडित व सायस पंडित अशी मृतांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पांगरी कॅम्प येथील सायस पंडित यांची पत्नी प्रियंका पंडित हिने विष पेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सायसनं गळफास घेवून आपलं जीवन संपवलं. स्थानिक नागरिकांना या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. नवरा- बायकोच्या आत्महत्या मागील कारण स्पष्ट झालं नसून पोलिस त्याचा शोध घेतायत. 


No comments