Breaking News

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रमाची माहिती डीजीटल मीडियाच्या पत्रकारांना द्या : राज्य निवडणूक आयोगाकडे एमडीएमएची निवेदनाद्वारे मागणी

बीड :  राज्यात यंदा होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती मिनिस्ट्री मीडिया प्रमाणे डिजीटल मीडियाच्या पत्रकारांना देण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र डीजीटल मीडिया असोसिएशनने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र डीजीटल मीडिया असोसिएशन (एमडीएमए) ही डीजीटल मीडियाची राज्यातील स्वनियामक संस्था आहे. महाराष्ट्रात यंदा होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून डीजीटल मीडियाच्या माध्यमातून वाचकांना व मतदारांना मतदान करण्यासाठी तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे, दुरुस्ती इत्यादी बाबत निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटच्या हायपरलिंक टाकून प्रोत्साहित केले जाते. तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिये बाबत लेखमाला लिहून मतदारांना जागरूक केलं जातं आहे.

त्यामुळे डिजीटल मीडियातील पत्रकारांना ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिये बाबतची संपूर्ण माहिती राज्यातील ग्रामपंचायत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात यावी, त्या संबंधी राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी यांना निर्देशित करावे. अशी मागणी एमडीएमएचे अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे, जितेंद्र ठाकूर, अदवैत चव्हाण, सैफन शेख, अनुप फंड, विनायक शिंदे, गोपाल वाढे, डॉ. प्रवीणकुमार सेलूकर, परवेझ खान, आनंद भीमटे, महादेव हरणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

No comments