Breaking News

आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत कायम ... वनअधिकाऱ्यांचे कामापेक्षा जास्त सोंगे !

         

प्रतिकात्मक

                        
शेख कासम । कडा  

आष्टी तालुक्यात सर्वसामान्यामध्ये बिबट्याची दहशत कायम असताना, तालुक्यातील वनअधिकारी यांचे कामा पेक्षा सोंग जास्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकीकडे वनअधिकारी पासून वन कर्मचार्‍यांचा गाजावाजा व नुसताच गराडा घालून निशफळ बोलबाला दिसत आहे तर आष्टी तालुक्यात शेतकर्‍यांचा व महिलांंचा बळी घेऊन जखमी करुन दहशत करणारा नरभक्षक बिबटया धुमाकूळ घालत असल्याचं दिसत आहे.

गुरुवारी (दि.3)  सकाळी आष्टी जामगावच्या रस्त्यापासून काही अंतरावर असणार्‍या सालेवाडी शिवरात ज्वारी पिकाला पाणी देणारे शेतकरी विकास विठोबा झगडे यांच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले असून अशा प्रसंगी त्यांनी आपल्या जवळ आवाज येईल, अशी घुंगराची घाघरमाळ वाजवली.  मोठ- मोठ्याने आरोळी देताच त्या नरभक्षक बिबट्याने तेथून पळ काढला असावा असे बोलले जात आहे. ही वार्ता कळताच वराती मागून घोड्यागत आष्टीचे अधिकार्‍यांने जखमी शेतकर्‍यासमोर वाजागाजा करत आम्ही किती दक्ष आहोत असा गराडा घालत शेतकर्‍याशी संवाद साधत आपल्या कामाची तत्परता दाखवली मात्र त्यांनी आता पर्यंत बिबट्याच काय त्यांचा माग किंवा त्यांनी लावलेले देखाव्या पिंजर्‍यात कसला हिंस्र प्राणी अडकला किंवा जेरबंद करण्यास  येश आले नाही असे चित्र त्यांच्या कामाने स्पष्ट दिसत आहे.


No comments