Breaking News

पालकमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कामकाजाबाबत आढावा बैठक

 


बीड : राज्याचे सामाजिक न्याय व  विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनजंय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली  दि. 9 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विविध कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

विविध कामकाजाची सूची व वेळ पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 11.00 वाजता कोव्हीड-19 संदर्भत आढावा, सकाळी 11.30 वाजता पाणी आरक्षित करणेबाबत, दुपारी 12.30 वाजता जिल्ह्यातील आधारभूत केंद्र चालू करणे, कापूस खरेदी केंद्र सुरु करणे बाबत, दुपारी 1.00 वाजता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामकाजाचा आढावा, दुपारी 2.00 वाजता बीड नगर परिषद विविध योजना व विकास कामांचा आढावा आणि दुपारी 3.00 वाजता महावितरण विभागाचा आढावा घेण्यात येणार आहे.

No comments