Breaking News

केज तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या


गौतम बचुटे । केज  

केज तालुक्यातील शिरूर घाट आणि चंदन सावरगाव येथे एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनेत गळफास घेऊन दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. 

या बाबतची माहिती अशी की, शिरूरघाट ता. केज येथील सौ. गोदावरी रमेश सांगळे वय (३५ वर्ष) या महिलेने दि.१३ रोजी पहाटे ४:३० ते ५:०० च्या सुमारास घरा समोरील बाभळीच्या झाडाला सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा पती हा पुणे येथे असून तिला दोन मुली व एक मुलगा असे अपत्ये आहेत.

तर दुसऱ्या घटनेत चंदन सावरगाव येथे सलून व्यावसायिक प्रमोद संभाजी राऊत वय (२९ वर्ष) या विवाहित युवकाने दुपारी २:३० वा. च्या सुमारास त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळे जवळील चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला एक सहा महिने वयाचा मुलगा आहे. या आकस्मिक मृत्यूची बाबत केज आणि युसुफवडगाव पोलीस ठाण्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे गुन्हा नोंद  झाला आहे. दरम्यान एकाच दिवशी केज तालुक्यात दोन आत्महत्या घडल्या आहेत. दोन्ही घटनेतील मयताचे केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे.


No comments