Breaking News

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात शेतकरी बचाव कृती समितीचा माजलगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

दिंद्रुड :  दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी विरोधी विधेयकाच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या मागण्या मान्य करा या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने दि ०५ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी १२:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला.

 

या मोर्चात शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करा.आदि घोषणा देत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. या मोर्चात किसान पुत्र म्हणून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या संघटनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.तहसील कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर शेतकरी बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकर्यांना मार्गदर्शन केले व दिल्लीतील आंदोलनाची मोदी सरकारने दखल न घेतल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनात शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष माकपाचे तालुका सचिव कॉम्रेड मुसदिक बाबा सर, यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव कृती समितीचे उपाध्यक्ष शेकापचे भाई अँड. नारायण गोले पाटील, वंचित आघाडीचे अंकुशराव जाधव, शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव  धम्मानंद साळवे, सहसचिव अमित नाटकर, अँड.सय्यद याकूब यांच्यासह शेकापचे लहु सोळंके, सिद्धेश्वर गायकवाड, सुदाम चव्हाण, संभाजी चव्हाण, राजेभाऊ घोडके, समाधान पौळ,मुंजा पांचाळ, शेषराव अबुज, सिटूचे शिवाजी कुरे,काँग्रेसचे शेख अहेमद, हरिभाऊ सोळंके, शेख रशीद, एम आय एम चे इदरीश पाशा, युसुफभाई मौलाना आझादचे नुमान चाऊस, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रशांत बोराडे, एस एफ आय चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सुहास झोडगे, नितीन झोडगे, अजय दांगट, किसान सभेचे कॉम्रेड विनायक चव्हाण, भगवान पवार, सुदर्शन हिवरकर, शेख मेहबूब, मुस्तकीन, सय्यद फारुक, सय्यद रफिक,वंचित युवा आघाडीचे संदीप फंदे, बाळासाहेब गायसमुद्रे, शत्रुघन कसबे, संभाजी ब्रिगेडचे विजय दराडे पांडुरंग गोंडे यांच्यासह हजारो शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते निवेदना पूर्वी दिल्ली येथे आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकरी नेते यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.


No comments