Breaking News

राज्यपाल कोशारी यांनी 'पोलिस बॉईज' चं केलं कौतुक !


राहुल दुबाले यांनी राज्यपालांकडे पोलिसांच्या मांडल्या व्यथा
; प्रश्न मार्गी लावण्याचं दिलं राज्यपाल कोशारी यांनी आश्वासन

बीड : पोलिस बॉईज संघटनेचे राहुल दुबाले यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची सोमवारी (दि.१४) भेट घेवून राज्यातील पोलिसांच्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. यावेळी कोशारी यांनी पोलिस बॉईज संघटनेच्या कार्याचे कौतुक करुन पोलिसांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु,असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. 


पोलिस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी सोमवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी दुबाले यांनी पोलिस अधिकारी- कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या दुर्लक्षित झालेल्या अडचणीकडे राज्यपाल कोशारी यांचे लक्ष वेधून घेवून त्या मांडल्या. तसेच पोलिसांचे  स्व: रक्षण, आरोग्य आणि त्यांच्या मुलांचे शिक्षण, रोजगार आणि निवारा या मूलभूत गोष्टींवर सविस्तर चर्चा केली. 

राज्यपाल कोशारी यांनी पोलीस परिवारा संबधी आपुलकी व्यक्त करीत राज्यातील पोलिस अधिकारी- कर्मचारी व त्यांच्या परिवाराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी, कायम प्रयत्न करेल. अशी गाव्ही राज्यपाल कोशारी यांनी देत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना नेहमीच सकारात्मक कामे करीत राहील. आशा शब्दात अपेक्षा व्यक्त करत संघटनेच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन पोलिस बॉईज संघटनेचे व दुबाले यांच्या कामाचं त्यांनी कौतुक केले. No comments