Breaking News

कामातील प्रामाणिकपणा ध्येयपूर्तीसाठी गरजेचा : डॉ आनंदगावकर


बाळासाहेब आडागळे । माजलगाव

  परिस्थिती समोर हतबल न होता मानवाने इच्छाशक्ती प्रबळ ठेवली. कामामध्ये प्रामाणिकपणा ध्येयपूर्तीसाठी गरजेचा असतो असे प्रतिपादन डॉ  प्रकाशराव आनंदगावकर यांनी सुंदरराव सोळंके महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त बोलताना व्यक्त केले.

     

थोर  गणितज्ञ श्रीनिवास रामाणूज यांचा जन्मदिन गणित दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सुंदरराव सोळंके महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. पी. पवार होते तर डॉ. प्रकाशराव आनंदगावकर, पत्रकार ऍड विजय मस्के.प्रा डॉ जी. के. सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना डॉ आनंदगावकर म्हणाले की,भारताने वैज्ञानिक क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे त्यात गणिताचे श्रेय महत्वाचे आहे.

 

कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही. पी. पवार म्हणाले की,भारतामध्ये महान विभूती झालेल्या आहेत तेच खरे आपले आदर्श आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सानप यांनी केले तर आभार डॉ भाऊसाहेब राठोड यांनी मानले.यावेळीकोविड19 च्या नियमांचे पालन करण्यात आले. कार्यक्रमाला प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.


No comments