Breaking News

परळीकरांचे सहकार्य सदैव आठवणीत - पो. नि.बाळासाहेब पवार

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पो.नि.सुरेश चाटे 

परळी  : संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परळीकरांनी नेहमीच सहकार्य केले असून परळीकरांची ओळख बाहेर जास्त बदनाम केली गेली. मी जेंव्हा संभाजीनगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला तेंव्हा मला परळीकरांनी जे सहकार्य केले ते मला सदैव आठवणीत राहील असे प्रतिपादन संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दि.१८ डिसेंबर २०२० रोजी निरोप समारंभ कार्यक्रमात केले. तर, नूतन पदभार स्वीकारलेले संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील. पो.नि.बाळासाहेब पवार यांची बदली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला झाल्याबद्दल त्यांना निरोप दिला. यावेळी त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल व फेटा बांधून व पेढे भरवून करण्यात आला. 


      

पो.नि.बाळासाहेब पवार यांची बदली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला झाली असून त्यांच्या कारकिर्दीबद्दल प्रकाश टाकण्यात आला. परळीतील दोन वर्षाच्या कार्यकाळात गुन्ह्यांची मोठ्याप्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. सन २०१८ - ११७, २०१९ - ८८, व सन २०२० नोव्हेंबर - ७५ गुन्ह्यांची नोंद, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान आणि परळीत मूकनायक पुरस्काराने सन्मानित. त्याची ओळख कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी म्हणून नेहमी राहील. 

      यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. प्रदीप एकसिंगे, अशोक खरात, मोहन जाधव, संभाजी नगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. नारायण गित्ते, चांद मेंडके, सचिन सानप, भताने, राठोड, आढे, बाबासाहेब आचार्य, विलास देशमुख, दत्ता गित्ते, मस्के, केदार, आदींसह ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, रानबा गायकवाड, जगदीश शिंदे, भगवान साकसमुद्रे, धनंजय अरबुने, दत्तात्रय काळे, बाळासाहेब फड, बाळकिशन सोनी, प्रा.प्रवीण फुटके, गणेश अडोदे, संभाजी मुंडे,  महादेव शिंदे, नितीन जाधव, महादेव गित्ते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात संभाजी नगर पोलिस स्टेशन व पत्रकारांच्या वतीने निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इंजि.भगवान साकसमुद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार  पो.उप.नि. चांद मेंडके यांनी मानले.



No comments