Breaking News

भ्रष्ट व मुजोर दुय्यम निंबधक आधिकार्याची खतेनिहाय चौकशी करावी : पीआरपीचे राकेश साळवे यांची विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी


बाळासाहेब आडागळे । माजलगाव  

येथील प्रभारी दुय्यम निबंधक श्री.राठोड पी.एम. या भ्रष्टाचारी व मुजोर अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्याच्या मागणीसाठी पि.आर.पि.च्या वतिने विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे पि.आर.पि.चे तालुकाध्यक्ष राकेश साळवे यांनी केली आहे. 

यासंदर्भात पि.आर.पी.च्या वतिने विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की माजलगाव येथील दुय्यम निंबधक कार्यालयातील प्रभारी दुय्यम निंबधक राठोड हे  दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या लोकांना व्यवस्थित वागणुक देत नाही व मनमानी कारभार करतात तसेच दस्त नोंदणीसाठी अवाजवी पैशाची मागणी करीत त्यामुळे अशा मुजोर व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करुन पदभार काढण्यात यावा . सदरच्या कार्यालयात रजिस्ट्रीची कामे करत असतांना शेतकरी वर्गाची अडवणूक करुन त्यांच्याकडून मनमानी पैशाची मागणी केल्या जाते,गेल्या २ वर्षापासून याच्याकडे सदरचा पदभार आहे.यावर वरिष्ठांचा कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही . सदरचा प्रभारी अधिकारी हे मंत्रालयापर्यंत आपले लागेबांधे,वशील असल्याचे बतावणी करतो त्यामुळे जिल्हास्तरावरच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे ऐकत नाहीत,अशा मुजोर अधिकाऱ्याची चौकशी करुन त्याचा पदभार काढण्याच्या मागणीचे निवेदन पि.आर.पी.च्या वतिने तालुकाध्यक्ष राकेश साळवे यांनी विभागीय आयुक्त यांना दिले आहे.


No comments