Breaking News

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसंग्राम आयोजित स्वच्छता अभियानास बीडकरांचा उस्फुर्त सहभाग


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतचा रस्ता चकाचक !

शेकडो सामान्य बीडकर, व्यापारी, आबालवृद्धांनी हातात झाडू घेऊन अभियानात सहभागी झाले

बीड :  शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्रामच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत दि ०५ डिसेंबर २०२० रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. या अभियानास बीडकरांनी उस्फुर्त सहभाग नोंदवत शेकडो सामान्य बीडकर, अबालवृक्ष, व्यापारी या अभियानास हातामध्ये झाडू, टोपली, कचरा बॅग घेऊन उतरले होते.  

   

शिवसंग्रामच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या अभियानाची सुरुवात केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, हिरालाल चौक व आसपासची बाजारपेठ, बिंदूसुरा नदीवरील पूल, सुभाष रोडसह माळीवेस, शहर पोलीस ठाणे परिसर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक परिसर आदी भागाची स्वच्छता शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व प्रकारे काळजी घेत अभियानात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला हॅन्डग्लब्ज, मास्क, सॅनिटायजर देण्यात आले होते. या अभियानाचे बीडकरांकडून सहभाग नोंदवत स्वागत देखील करण्यात आले व व्यापाऱ्यांनी आभारही मानले.

    


यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, ऍड राहुल मस्के, प्रा. विनोद कवडे, जेष्ठ नेते लक्ष्मण दादा ढवळे, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, माजी सभापती प्रा. ज्ञानेश्वर कोकाटे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, युवक सरचिटणीस विनोद हातागळे, मनोज जाधव, नंदू पिंगळे, नितीन आगवान, गणेश धोंडरे, कैलास शेजाळ, जाकेर हुसेन, मच्छिन्द्र कुटे, कुतुब भाई, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, शकील खान, सातीराम ढोले, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, युवक तालुकाध्यक्ष गणेश साबळे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अक्षय माने, विद्यार्थी सरचिटणीस प्रशांत डोरले, शहराध्यक्ष सौरभ तांबे, सामाजिक न्याय सरचिटणीस सुनील धायजे,  लालाभाई शेख, मुस्तफा भाई, स्वप्नील हातागळे, राजेंद्र माने, विजय सुपेकर, शैलेश सुरवसे, शेख नसीर, बापूसाहेब चौघुले, संकेत गुजर, रवी हातागळे, प्रा. लांगोरे आदींसह शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्ते, बीडकर उस्फुर्तपणे सहभागी होते.


No comments