Breaking News

बीडमध्ये खड्डे बुजविण्याचा तमाशा, गुत्तेदाराला पोसण्यासाठी केला का? वाहनधारकांसह नागरिकांचा संतप्त सवाल
* तेलगावनाका ते खंडेश्वरी रस्त्यावरील धुराळाखड्डे जैसे थे ! 
* वाहनधारकांची जीवघेणी कसरत अद्यापही सुरू 
आमदार साहेब खड्याला तरी ठिगळं नीट लावायला सांगायची ?

बीड : शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण झाले होते. त्यामुळे खड्यांची डागडुजी करून बुजविण्यात देखील आले. मात्र तेलगावनाका ते खंडेश्वरी रस्त्यावर थातुरमातुर खड्डे बुजून जलद गतीने काम आटोपते घेतल्या गेल्याचं दिसत आहे.  त्यामुळं खड्डे जैसे थे अशी स्थिती याठिकाणी ओढावल्यानं तेलगावनाका ते खंडेश्वरी रस्त्यावर धुराळा आणि खड्यांनी नागरिक पुन्हा त्रस्त झालेत. वाहनधारकांची जीवघेणी कसरत अद्यापही या रस्त्यावर पाह्यला मिळते. खड्डे  बुजविण्याचा तमाशा, गुत्तेदाराला पोसण्यासाठी का? असा संतप्त सवाल वाहनधारकांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात असून आमदार साहेब रस्त्यावरील खड्यांना ठिगळं तरी नीट मारायला सांगायची ना, अशी मिश्कील चर्चा नागरिकांमध्ये सध्या होत आहे.  

बीड शहरातील जालनारोड, बार्शीरोड आणि तेलगावनाका चौक ते खंडेश्वरी रस्त्या दरम्यान खड्डेचं - खड्डे पडल्यामुळे बीडकरांना कसरत करीत मार्ग काढावा लागत होता. त्यामुळं नागरिक त्रस्त झाले होते. खड्यांतील जीवघेणा प्रवासातून कधी सुटका होईल, याचीचं प्रतीक्षा सर्वांना होती. त्यामुळे लॉकडाऊननंतर रस्ते खुले झाल्यावर खड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्यांची डागडुजी करुन ती तात्काळ बुजविण्यात यावेत, असं फर्मान सोडलं.  त्यानुसार साधरणपणे रस्त्यावरील खड्डे दिड- दोन महिन्यांपूर्वी बुजविण्यात आली.  
मात्र तेलगावनाका ते खंडेश्वरी रस्त्यावर पडलेल्या खड्यांची थातुरमातुर डागडुजी करुन आमदार साहेबांच्या आदेशाचं पालन व नागरिकांची समजूत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. काही खड्ड्यात दगड खडीचा  व डांबर शिंपडून तर काहींना दुर्लक्षित करुन पुन्हा काम मिळालं पाहिजे. या लालसेपोटी काम आटोपते घेण्यात आल्याचा करंटेपणा करण्यात आल्याची प्रतिक्रिया वाहनधारक व्यक्त करत आहेत. त्यामुळेचं तेलगावनाका ते खंडेश्वरी रस्त्यावर खड्यांचा व धुळीच्या लोटीचा सामना वाहनधारकांसह नागरिकांना व रस्त्यालगत असलेल्या व्यावसायिकांना करावा लागतोय. धुळीच्या लोटीमुळे व्यवसायीक, नागरिक, वाहनधारकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
शिवाय याच रस्त्यावर असलेल्या आदित्य डेंटल महाविद्यालयात शासकीय रुग्णालय आहे. रुग्णवाहिकेला रुग्णांची ने- आन करावी लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून वाहनधारकांना मणक्याचा आजार उदभवत आहे. खड्डे आणि त्यातील दगड टायर खाली आल्याने उडून पादचाऱ्यांना लागून इजा होत असून खडा चुकवितांना अपघात होत असल्याच्या घटना घडत वाहनधारक जखमी होतायत. मात्र खडे बुजविण्याचा उद्योग करुन कार्यकर्ते गुत्तेदार यांना पोसण्याचा काम करून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे की, काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. 
क्षीरसागरांना बीडकर वैतागले - डॉ. जाधव

मुख्य रस्त्यांवर खड्डे पडलेत तर विकासाच्या नावावर शहरातील अनेक भागात रस्ते खोदण्यात आली असून नागरिकांना चालणेही मुश्कील झालं आहे. आपल्या कार्यकर्त्यांना आणि गुत्तेदारांना पोसण्यासाठी एकाने कामे काढायची दुसऱ्याने ती अडवायची अशी स्थिती सध्या बीड मध्ये असून शहराचा बट्याबोळ क्षीरसागर घराण्याने केला आहे. क्षीरसागर घरण्याचं हे टक्केवारीचं धोरण नागरिकांच्या लक्षात आले असून क्षीरसागरांना बीडकर वैतागले आहेत. अशी प्रतिक्रिया भाजपाचे भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव यांनी व्यक्त केली. 


No comments