Breaking News

मुरमाड रानात भटक्या पारधी समाजातील पारधी जातीच्या युवकांनी फुलविली दोडक्याच्या शेती


पाऊण एकरात दोन लाखाचे उत्पन्न

गौतम बचुटे । केज 

ईच्छा जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर अशक्य काही नसते. केज तालुक्यातील साळेगाव येथे मुरमाड जमिनीत आणि अवघ्या पाऊण एकरात आदिवासी समाजातील पारधी जातीतील तीन भावांनी दोडक्याचे दोन लाख रु. चे उत्पन्न घेतले आहे.

साळेगाव ता केज येथील राजाभाऊ पवार यांची वडिलोपार्जित जमीन आहे त्यांची तिन्ही मुले ही सुशिक्षित आहेत त्या पैकी महेश पवार हा एमए बीएड, दुसरा सागर पवार याने अभियांत्रिकी पदविकाधारक तर तिसरा मुलगा दिनेश पवार हा पदवीधर तरुण आहे.

नौकरी लागत नसल्यामुळे या तिघा भावांनी रिकामे बसण्या पेक्षा स्वतःच्या शेतात भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला मात्र फळ भाज्यांच्या लागवडीची माहिती नसतानाही त्यांनी गावातील भाजीपाला उत्पादक शेतकरी व काही मासिकातून माहिती घेत त्यांनी आपल्या पाऊण एकर जमीनत दोडका लागवड केली. त्यासाठी बेड तयार करून रोपांची लागवड केली. आणि बांबू व तारांचे मांडव केले. ड्रीप द्वारे पाणी व्यवस्थापन व विद्राव्य खतांचे मात्रा आणि वेळोवेळी कीड नियंत्रणासाठी फवारणी केली. गवडी नंतर ४५ दिवसात पहिली तोडणी केली एक दिवसा आड तोडणी केली असता सुमारे एक ते सव्वा क्विंटल माल निघत आहे सुमारे दीड महिना हे पीक चालत आहे यातून जवळ जवळ अडीच ते तीन टन दोडका त्यांनी केज, कळंब आणि साळेगावच्या आठवडी बाजार व एरवी विक्री केली आहे. स्थानिक बाजार भावा प्रमाणे त्यांना प्रती किलो प्रमाणे ६० रु ते ८० रु. आणि कधी कधी त्याही पेक्षा जास्त भाव त्यांना मिळाला. दोडका लावडीसाठी त्यांना रोपे खरेदी, आंतर मशागत, खते, फवारणी व पूर्व मशागतीसाठी सुमारे पन्नास हजार रु खर्च झाला. तो खर्च वजा जाता पवार कुटुंबाच्या मेहनत आणि जिद्दीला फळ आले असून त्यांना पाऊण एकर जमिनीत निव्वळ दीड लाख रु चा नफा दोडक्याच्या फळ भाजीतून झाला आहे.

शिकूनही नौकरी नसल्यामुळे आम्ही शेती करण्याचा निर्णय घेतला. परंतु अनुभव नसल्यामुळे व सर्व नवीन असलो तरी आम्ही शिकत गेलो. त्यातून आम्हाला समाधानकारक उत्पन्न मिळाले. तसेच बाजार भावही चांगला मिळाला.

         ----- महेश पवार

तोडणी खुरपणी व अंतर मशागतीसाठी आमची आई, बहीण व वडील यांची खूप मदत झाली. त्यामुळे मजुरांचा खर्च कमी झाला.

                 --- सागर पवार

मी माझ्या तिन्ही मुलांना शिक्षण दिले असून आमचे कुटुंब हे सन्माने जगत आहे.

----- राजाभाऊ पवार, (वडील)

No comments